नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील रात्रीच्या वेळी बंद कंपनीमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सुमारे दोन लाख 36 हजार रुपयांचे तांब्याचे भाग चोरी करून नेल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र नरेंद्र पवार (56) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील कृष्णा उद्योग प्लॉट नंबर जी-74 या कंपनीमध्ये 2 ते 3 मेच्या दरम्यान रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दोन लाख 36 हजार रुपये किमतीचे तांब्याचे विविध प्रकारचे भाग चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक उत्तम सोनवणे तपास करीत आहेत. या प्रकारांमध्ये कंपनी व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही न बसविल्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान आहे.