जळगाव : सराफ दुकानावर दरोडा, ३० लाखांचे दागिने लंपास | पुढारी

जळगाव : सराफ दुकानावर दरोडा, ३० लाखांचे दागिने लंपास

जळगाव पुढारी वृत्तसेवा : 

मुक्ताईनगर शहरातील अंबिका ज्वेलर्स या सराफ दुकानावर दरोडा टाकण्यात आला असून यात चोरट्यांनी सोने आणि चांदी असे एकत्रीतपणे सुमारे ३० लाखांचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफ दुकानात रात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंबिका ज्वेलर्सचे संचालक अनिल शूरपाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दुकानात दरोडा पडल्याची माहिती मिळाली. यात सुमारे २५ लाख रूपयांची चांदी तर पाच लाख रूपयांच्या सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर जळगावहून तपासासाठी श्‍वान पथक निघाल्याची माहिती  संचालकांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button