नाशिक : सिटीलिंक बसमधून प्रवासात वृद्धेचे दागिने लंपास | पुढारी

नाशिक : सिटीलिंक बसमधून प्रवासात वृद्धेचे दागिने लंपास

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड ते पंचवटीदरम्यान सिटीलिंक बसमधून प्रवास करणार्‍या एका वृद्ध महिलेचे सुमारे 72 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हौसाबाई लहाने (रा. सोनगिरी, ता. सिन्नर) या पंचवटी येथे जाण्यासाठी नाशिकरोड येथून सिटीलिंक बसने प्रवास करीत असताना, त्यांची नजर चुकवून अज्ञाताने 60 हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची पोत व 12 हजार रुपये किमतीची सोन्याची नथ असा ऐवज त्यांच्या पर्समधून लंपास केला. ही घटना लक्षात येताच, त्यांनी शोधाशोध केली; परंतु दागिने मिळाले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button