त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत राऊतांकडून दिशाभूल, मनसेच्या तालुकाध्यक्षांचा आरोप | पुढारी

त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत राऊतांकडून दिशाभूल, मनसेच्या तालुकाध्यक्षांचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सकाळची काकडा आरती होत नाही. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरावर भोंगे लावलेले नाहीत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पहाटेची आरती झाली नाही, असे विधान शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी कशाच्या आधाराने केले, असा प्रश्न मनसेचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी विचारला आहे. तसेच स्वत:ला हिंदू समजणारे संजय राऊत यांना हिंदू परंपरांची माहिती नाही, अशीही टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे राज्यभरात पोलिस बंदोबस्त तैनात करून मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. त्यातच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या आंदोलनामुळे शिर्डीत साईबाबा व त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटेच्या काकडा आरती होऊ शकल्या नसल्याचा दावा केला होता. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात काकडा आरती होत नाही, त्यामुळे आंदोलनामुळे ती आरती होऊ शकली नाही, या दाव्याला कशाचाही आधार नाही.

त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी हे विधान कशाच्या आधारावर केले आहे, असा प्रश्न कोठुळे यांनी विचारला आहे. तसेच खा. संजय राऊत स्वत:ला हिंदू समजतात, मग त्यांना मंदिरांमधील परंपरा माहिती नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. यामुळे संजय राऊत यांनी खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल करू नये, असे म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button