लाटांनी केला ‘ढगांना’ स्पर्श! | पुढारी

लाटांनी केला ‘ढगांना’ स्पर्श!

लंडन : सोशल मीडियात अनेक वेळा अनोखे व्हिडीओ पाहायला मिळत असतात. आताही एक असाच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये समुद्राच्या लाटा चक्‍क ढगांना स्पर्श करीत असल्याचे दिसून येते. अर्थात हे ढग आकाशातील खरोखरचे ढग नाहीत. तितक्या उंच लाटा असत्या तर ही किती मोठी त्सुनामी असती याची कल्पना करवत नाही! या व्हायरल व्हिडीओत असे दिसून येते की समुद्राची लाट उंच उसळून वर तरंगत असलेल्या ढगांना स्पर्श करीत आहे.

एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 37 सेकंदांचा हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत 15 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असा प्रश्‍न पडतो की समुद्राच्या लाटा इतक्या उंच कशा उसळल्या? यामध्ये जे ‘ढग’ दिसून येत आहेत ते खरोखरचे ढग नसून ते ‘एअरोसोल’ आहेत. एअरोसोल हे हवेत सूक्ष्म अशा घनस्वरूपात किंवा सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात अस्तित्वात असतात. समुद्राच्या आसपास किंवा पर्वतांवर असे एअरोसोल पाहायला मिळतात. सकृतदर्शनी ते अगदी ढगांसारखे दिसतात. या व्हिडीओतही अशाच ढगाला समुद्राची लाट स्पर्श करीत असल्याचे दिसते.

 व्हिडिओ पाहा : आणि त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला | Last Day of Ch.Shahu maharaj

Back to top button