धुळे : बल्हाणेतील तरुणांनी सुरू केला किसान क्रांती भाजीपाला मार्केट | पुढारी

धुळे : बल्हाणेतील तरुणांनी सुरू केला किसान क्रांती भाजीपाला मार्केट

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील बल्हाणे गावातील तरुणांनी एकत्र येऊन सुकापूर फाटा येथे किसान क्रांती भाजीपाला मार्केट उभारले. त्याचे उद्घाटन तीर्थक्षेत्र नागाई येथील महंत श्री १००८ प्रणव गिरीजा बाबाजी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकी संघाचे अध्यक्ष विलास बिरारारीस, भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री दुल्हभ जाधव, बल्हाणेचे सरपंच जितेंद्र बिरारीस, डॉ.गिरीश अहिरराव भारतीय किसान संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, जिल्हा प्रचार प्रमुख डी.डी.महाले, जिल्हा कार्यकारणी प्रा.जगदीश सोनवणे, तालुका मंत्री काशीनाथ शिंदे, उपाध्यक्ष ताराचंद अहिरे, शांताराम बिरारीस, खंडेराव सोनवणे, जांबू माळी, सुभाष बिरारीस, अनिल कुवर, रोशन नेने, भास्कर बिरारीस, संजय सोनवणे, बाळा कुवर, विजय बागुल, यशवंत अहिरे, पंडित चौरे, सरपंच संजय भदाणे, शरद चव्हाण आदी उपस्थित होते. दुल्हाब जाधव यांनी सेंद्रिय शेतीची माहिती दिली. प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी किसान संघाची भूमिका शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन करून किसान क्रांती मार्केटला शुभेच्छा दिल्या. किसान क्रांती मार्केटचे संचालक रिंकू पाटील, विकी कुवर, शुभम अहिरराव, उमाकांत बिरारीस, महेश दाभाडे, विवेक बिरारीस, गणेश दाभाडे, मिलिंद दाभाडे, विशाल बिरारीस, मयुर अहिरराव, भारतीय किसान संघाचे ग्राम प्रमुख धनराज पाटील यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.  डी.बी.कुवर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

Back to top button