मेहुल चोक्सीची नाशिकमधील 100 एकर जमीन प्राप्तिकर विभागाकडून जप्त

नाशिक पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याच्या मालकीची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील 100 एकर जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा (PBPT) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
मेहुल चोक्सी याच्या गीतांजली जेम्स या कंपनीतून एका कंपनीत पैसा हस्तांतर करण्यात आला होता. या कंपनीच्या माध्यमातून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे प्राप्तीकर विभागाने केलेल्या तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या जमीनीची किंमत जवळपास 70 कोटींच्या घरात आहे.
हेही वाचा :
- गडचिरोली : मृत्यूस प्रभारी अधिकारीच जबाबदार : आत्महत्या करणाऱ्या जवानाची सुसाईड नोट व्हायरल
- Rashmika Mandanna : रश्मिका घेते ‘इतके’ मानधन
- कोल्हापुरात आजपासून दोन दिवस पहिले मराठी चित्रपट संमेलन होणार