नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणासाठी मनपा दोन लाख नागरिकांचा फीडबॅक घेणार | पुढारी

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणासाठी मनपा दोन लाख नागरिकांचा फीडबॅक घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात सिटिझन फीडबॅक या घटकात नाशिक मनपाला कमी गुणांकन मिळाल्याने मनपाच्या क्रमांकात घसरण होत आहे. यामुळे यंदा या घटकावर नाशिक मनपाने जोर दिला असून, दीड ते दोन लाख नागरिकांकडून सिटिझन फीडबॅक घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याद़ृष्टीने मनपा प्रशासक रमेश पवार यांनी अभियानात सहभाग घेण्याच्या द़ृष्टीने केलेल्या आवाहनानुसार राजकीय पक्षांसह विविध सेवाभावी, शैक्षणिक व सामाजिक संस्था सहभागी होत आहे.

सिटिझन फीडबँकमध्ये आतापर्यंत सुमारे 23 हजार नागरिकांनी फीडबॅक भरला आहे. फीडबॅकसाठी 30 एप्रिलपर्यंत शेवटची मुदत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पवार यांनी केलेे. नागरिकांकडून ऑनलाइन फीडबॅक भरून घेण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची लिंक तसेच स्वच्छता अ‍ॅप नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2019 मध्ये 10 लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील 500 शहरांमध्ये 67 वा क्रमांक आला होता. सन 2020 मध्ये 11 व्या क्रमांकावर झेप घेतली तर 2021 मध्ये 17 व्या क्रमांकावर घसरण झाली. सिटिझन फीडबॅक या घटकात कमी गुण मिळाल्याने 17 व्या क्रमांकावर मनपाची घसरण झाली आहे. सिटिझन फीडबॅक भरण्यासाठी थेट राजकीय पक्ष, निमा, आयमा, क्रेडाई, शाळा, महाविद्यालये, आर्किटेक्ट असोशिएशन, व्यापारी संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेने यंदा दीड ते दोन लाख सिटिझन फीडबॅक भरण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची मुदत आहे.

हेही वाचा :

Back to top button