नाशिक : दोन सराईत मोबाईल चोर सातपूर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : दोन सराईत मोबाईल चोर सातपूर पोलिसांच्या जाळ्यात
Published on
Updated on

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा  : सातपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. मोबाईल चोरीकडे विशेष लक्ष केंद्रित करत सातपूर पोलिसांनी दोन सराईत मोबाईल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविवारी (दि. 24)  मोबाईल चोर अंबिका स्वीट अशोक नगरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून राजेंद्र कुल्लू ठाकुर (वय 24) यास मोटरसायकल सह ताब्यात घेतले.   पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मोबाईल चोरीचा गुन्हा कबुल केला व आपले आणखी साथीदार असल्याचे सांगितले. चोरलेले मोबाईल हे ज्या विक्री व दुरुस्ती करणा-यास विकले होते, त्या किरण गंगाळे या मोबाईल विक्रेत्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 20 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. यासह मोटसायकल असा एकुण 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात मुख्य आरोपी राजेंद्र कुल्लू ठाकूर (24)  व मोबाइल खरेदी-विक्रेता किरण गंगाळे यासह दोन विधि संघर्ष बालक यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news