नाशिक : कारच्या धडकेत पादचारी ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना वडाळानाका येथील उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी कारचालक समिर सुभाष लोहार (४२, रा. कर्मयोगीनगर, तिडके कॉलनी) यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित समीर लोहार हे एमएच १५ ईपी ६३४४ क्रमांकाची कार घेऊन शनिवारी (दि.२३) सकाळी उड्डाणपुलाखालून जात होते. त्यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने पादचाऱ्यास धडक दिली. त्यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालक लोहार फरार झाले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- पिंपरी : उद्योगनागरीमध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या प्रमाणात वाढ
- पिंपरी : बाजारात कांद्याची आवक दुप्पट; दरात दोन रुपयांची वाढ
- नाशिक : कृषिमंत्र्यांचा जुगार अड्ड्यावर छापा