

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात कांद्याच्या दरात दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची आवक गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात दुप्पट झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
शहराच्या पंचक्रोशीमधून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याची दिसून आले. मात्र, बटाट्याची आवक कमी झाली असली, तरी दरात मात्र घसरण झाली आहे.
कांद्याची आवक गेल्या आठवड्यापेक्षा 279 क्विंटलने वाढली आहे. तर बटाट्याची आवक गेल्या आठवड्यापेक्षा 119 किंवटलने घटली आहे. मात्र दरवाढ झालेली नाही.
कांद्याची 556 क्विंटल आवक झाली आहे. तर बटाट्याची आवक 433 क्विंटल झाली आहे. फळभाज्यांची गेल्या आठवड्यापेक्षा 223 क्विंटलने वाढली असून, 2 हजार 325 क्विंटल एवढी झाली आहे. पालेभाज्यांच्या 33 हजार 950 गड्ड्या बाजारात दाखल झाल्या असून, गेल्या आठवड्यापेक्षा 700 गड्या वाढल्या आहेत. फळांची आवक 821 क्विंटल झाली आहे.
तर, लिंबाची आवक 24 क्विंटल झाली असून, आवक मागील आठवड्यापेक्षा 9 क्विंटलने वाढली होती. त्यासोबतच 29 क्विंटल कैर्या बाजारात आल्या होत्या.
किलो मागे 55 रुपये असा दर असल्याची माहिती विके्रत्यांनी दिली. काकडीची आवक 130 क्विंटल झाली होती. टोमॅटोचा दर आठवड्यात जवळपास 15 ते 20 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. तर, रोजच्या वापरातील कांदा, बटाटाही 10 ते 15 रुपये किलोपर्यंत घाउक बाजारात होता.
कांदा : 25-30, बटाटा : 20-25, लसूण : 45-50, भेंडी : 45-50, गवार : 60-70 : टोमॅटो : 35-45, दोडका : 35-40, हिरवी मिरची (साधी) : 90, मिरची (कोल्हापुरी) : 110, मिरची (ढोबळी) : 20-25, दुधी भोपळा : 40, लाल भोपळा: 35, काकडी पांढरी : 50, काकडी गावरान : 60, कारली : 60-70, पडवळ : 65, पडवळ : 85, फ्लॉवर : 40, कोबी : 35, वांगी : 30-40, वांगी (भरीत) : 30-40, शेवगा : 50-60, गाजर : 25-30, बिन्स : 50,
पालक : 15, कोथिंबीर : 20, मेथी :15, शेपू : 10, कांदापात : 20, चाकवत – 15, पुदीना : 15, मुळा- 15
कलिंगड : 35-40, खरबूज : 30-35, द्राक्षे (पांढरे) : 70-80, द्राक्षे (माणिकचंद) : 85-90, द्राक्षे (काळे) : 85-100, सनखरबूज : 55-60, चिक्कू : 30-40.
बाजारात लिंबाची आवक वाढली आहे. चाकण, पाबळ, तळेगाव व शिरूर येथून लिंबाची आवक बाजारात झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात लिंबाचे दर कमी होऊन 150 रुपये किलो होते.
गेल्या आठवड्यात 200 ते 250 रुपये दर किलो मागे होता. हे दर पन्नास ते शंभर रुपयांनी कमी झाले असले तरी सामान्यांना परवडण्यासारखे नाहीत.