नाशिक : भाजपचे सिडकोत कंदील आंदोलन | पुढारी

नाशिक : भाजपचे सिडकोत कंदील आंदोलन

नाशिक (सिडको) पुढारी वृत्तसेवा 
वीज टंचाईच्या विरोधात सिडको परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंदील आंदोलन करण्यात आले. सिडकोतील अश्वीनगर  भागातील सिहस्थ चौकात भाजपाच्या वतीने करण्यात आलेल्या या कंदील आंदोलनात भाजपा चिटणीस डॉक्टर हर्षा फिरोदिया, माजी नगरसेविका शहर चिटणीस छाया देवांग, दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे, पिंटू  काळे, करण शिंदे, जयश्री पाटील, आशिष फिरोदिया, लोचन साळवे, जयश्री बारी यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्यात सुरु असलेले वीज टंचाई, लोडशेडिंग, वीज वसुली व वीज तोडणीच्या निषेधार्थ कंदील लावून महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजपाच्या वतीने सिडको परिसरातील विविध चौकात कंदील आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button