दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट | पुढारी

दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या तीन दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या २ हजारांहून अधिक नोंदवण्यात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ५४१ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ३० लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, १ हजार ८६२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोना (corona) संसर्गदर ०.८४ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची  (corona) संख्या ४ कोटी ३० लाख ६० हजार ८६ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २५ लाख २१ हजार ३४१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर, १६ हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २२ हजार २२३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. राजधानी दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. लागोपाठ तीन दिवसांपासून राज्यात १ हजारांहून अधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. दिल्लीत रविवारी कोरोनाचे एकूण १ हजार ८३ रुग्ण आढळले. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या पाच दिवसांमध्ये राज्यात कोरोना मृत्यूची नोंद घेण्यात आली नाही.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी ७१ लाख ९५ हजार ७८१ डोस लावण्यात आले आहेत. यातील २.६६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ६७ लाख १३ हजार ३२९ बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी ७४ लाख २० हजार ७३५ डोस पैकी १९ कोटी ९३ लाख ६९ हजार ६६० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ५० लाख १९ हजार ८१७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. ३ लाख २ हजार ११५ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

corona : देशातील बूस्टर डोसची स्थिती

  श्रेणी                                     बूस्टर डोस

१) आरोग्य कर्मचारी                 ४६,९८,३५१
२) फ्रंटलाईन वर्कर्स                 ७३,६१,४६१
३) १८ ते ४४ वयोगट                ९२,२६५
४) ४५ ते ५९ वयोगट               ३,२५,१४९
५) ६० वर्षांहून अधिक             १,४२,३६,१०३

हेही वाचलंत का ? 

Back to top button