नाशिक : काहीजण जाणीवपूर्वक समस्या निर्माण करताय : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला टोला | पुढारी

नाशिक : काहीजण जाणीवपूर्वक समस्या निर्माण करताय : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला टोला

नाशिक (पंचवटी): पुढारी वृत्तसेवा : आपण सर्व एक आहोत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहायचे, अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. याच विचारातून महाविकास आघाडीची वाटचाल सुरू आहे. मात्र काही जण जाणीवपूर्वक समस्या निर्माण करत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजपाला लगावला. मुंबई महामार्गालगत धात्रक फाटा परिसरात आयोजित उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेअंतर्गत रविवारी (दि.२४) मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारी आपण सर्व भारतीय आहोत. संविधानाने आपल्या सर्वांना एकत्र राहण्याचे अधिकार दिले आहेत. सारथी, महाज्योती, आर्थिक दुर्बल घटक अशा सर्वांनीच एकत्र शिक्षण घेतले पाहिजे. अशी भावना आणि हा विचार घेऊन महाविकास आघाडीचे कामकाज सुरू आहे. मात्र यातही कोणीतरी काही टिमकी काढतील. मात्र तरीही एकमेकांबद्दल चुकीची भावना अजिबात निर्माण होऊ द्यायची नाहीत, असे सांगत ना. यांनी भाजपावर नाव न घेता निशाणा साधला.

हेही वाचा:

Back to top button