नाशिक : महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याकडून 22 लाखांचा अपहार | पुढारी

नाशिक : महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याकडून 22 लाखांचा अपहार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने सुमारे 22 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संबंधित महिला कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी राकेश बाळकृष्ण पवार यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दिनांक 16 /7/ 2020 ते 8 /3/2022 महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी सुषमा प्रेम जी जाधव यांनी चेहेडी भरणा केंद्र बंद असताना देखील नाशिकरोड विभागीय कार्यालय भरणा केंद्रात चेहेडी केंद्राचा पासवर्ड व यूजर आयडीचा गैरवापर करून दैनंदिन पावत्या संलग्न संगणकीय प्रिंटेड स्टेशनरी व इत्यादी मौल्यवान दस्तऐवजाचा गैरवापर करून वर्ग 4 कर्मचारी त्यांची जबाबदारी नसताना पावत्या वर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.  या माध्यमातून एकूण रक्कम रुपये 21 लाख 79 हजार 862 रुपयांचा अपहार करून महापालिकेची फसवणूक केली असेही तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीनंतर नाशिकरोड पोलिसांनी मनपाच्या महिला कर्मचारी जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप उपनिरीक्षक वाघ हे करत आहे.

हेही वाचा :

Back to top button