जळगाव : अश्लील व्हिडिओ तयार करुन महिलेने वृद्धास केले ब्लॅकमेल, पैसेही उकळले | पुढारी

जळगाव : अश्लील व्हिडिओ तयार करुन महिलेने वृद्धास केले ब्लॅकमेल, पैसेही उकळले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करून महिलेने वृद्धास फसवून अश्लील चित्रफीत तयार करत ती संग्रहित करून समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. त्यानंतर वृद्धाकडून खंडणी उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील एका भागात ५७ वर्षीय वृद्ध वास्तव्यास आहे. सोमवारी (दि. १८) दुपारी ४ च्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून एका महिलेने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून हाय संदेश पाठवला. त्यानंतर फिर्यादीने जवळीकता साधून व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल केला. यावेळी महिलेने वृद्धाकडून अश्लील चित्रीकरण संग्रहित केले. त्यानंतर महिलेने हे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्याची धमकी देत १० हजार ५८० रुपयांची खंडणी उकळली. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसात अज्ञात दोन मोबाइलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button