नाशिक : बसमध्ये चढताना चार तोळ्यांची पोत लांबवली

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : सिन्नर बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेली.
बुधवारी (दि.20) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत नंदाबाई रमेश नवाळे (52, रा. चिंचोली, ता. सिन्नर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदाबाई नवाळे या टेंभुरवाडी, ठाणगाव येथे विवाहसमारंभासाठी निघाल्या होत्या. दुपारी 12 च्या सुमारास त्या बसमध्ये चढत असतानाच अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत चोरून नेली. बसमध्ये बसल्यानंतर नवाळे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिस नाईक चेतन मोरे तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- पिंपरी : पोलीस यंत्रणा अलर्ट
- नाशिक : प्रशासकीय अनास्था : वर्षभरानंतरही बहिणींची ताटातूट कायम
- लग्नात तरुणीला पिस्तूल दाखवत तरुणाचा डिस्को डान्स!!, व्हिडिओ व्हायरल