लग्नात तरुणीला पिस्तूल दाखवत तरुणाचा डिस्को डान्स!!, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

लग्नात तरुणीला पिस्तूल दाखवत तरुणाचा डिस्को डान्स!!, व्हिडिओ व्हायरल

पाटणा; पुढारी ऑनलाईन

बिहारमधील गोपालगंज येथील एका लग्नात पिस्तूल घेऊन डान्स करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सदर तरुण हातात पिस्तूल धरून ट्रिगरवर बोटे फिरवत आहे आणि तो स्टेजवर डान्स करणाऱ्या तरुणीवर बंदुकीचा निशाणा धरत असल्याचे व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

गोपालगंज येथील एका लग्न सोहळ्यातील ही घटना आहे. जेव्हा तरुण त्याच्या हातातील पिस्तूल डान्स करणाऱ्या तरुणीला दाखवतो तेव्हा ती घाबरुन जात असल्याचे दिसते. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक युवक हातात पिस्तूल धरुन आर्केस्ट्रातील तरुणीसोबत डान्स करत आहे.

गोपालगंजमधील शहर क्षेत्रात जादवपूर रस्त्यावरील एक घरात लग्नसोहळा होता. लग्नाच्या रात्री आयोजित केलेल्या कार्यक्रमात अचानक एक युवक स्टेजवर येतो आणि तो तरुणींसोबत डान्स करायला सुरुवात करतो. तसेच तो पिस्तूल काढून तरुणीसोबत डान्स करतो. गोपालगंज पोलिसांनी सदर युवकाची ओळख पटवली आहे. या प्रकरणी कारवाई केली जात आहे.

 

Back to top button