नाशिक : मिठसागरे सोसायटीवर ‘शेतकरी विकास’चा झेंडा | पुढारी

नाशिक : मिठसागरे सोसायटीवर ‘शेतकरी विकास’चा झेंडा

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा : मिठसागरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व आनंदा कांदळकर यांनी केले. त्यांनी अ‍ॅड. शरद चतुर व परसराम कथले यांच्या नेतृत्वाखालील जय श्रीराम पॅनलचा धुव्वा उडवला.

सर्वसाधारण गटातून शेतकरी विकास पॅनलचे काळू कथले (200), कैलास कासार (183), दिलीप कासार (183), सारंगधर कासार (183), उत्तम चतुर (183), गोरक्षनाथ चतुर (185), सुनील चतुर (191), अनिल जाधव (199) यांनी विजय संपादन केला, तर जय श्रीराम पॅनलचे बाबासाहेब कासार (162), माधव कासार (159), सोन्याबापू कासार (171), संजय कासार (159), अशोक चतुर (151), भगवान चतुर (160), संदीप चतुर (159), अर्जुन जाधव (159) यांचा दारुण पराभव केला.

महिला राखीव गटातून शेतकरी विकास पॅनलच्या कमल कासार (195), चंद्रभागा कासार (195) यांनी जय श्रीराम पॅनलच्या सुमन कासार (169), हिराबाई डावरे (184) यांच्यावर दणदणीत विजय मिळविला. इतर मागास प्रवर्गातून शेतकरी विकास पॅनलचे शुभम कासार (212) हे विजयी झाले, तर जय श्रीराम पॅनेलचे दौलत कथले (163) यांना पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी विकास पॅनलचे पांडुरंग वाघ (198) विजयी झाले, तर जय श्रीराम पॅनेलचे किशोर वाघ (173) पराभूत झाले. विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून शेतकरी विकास पॅनलचे आनंदा कांदळकर (214) यांनी जय श्रीराम पॅनलचे किरण गंगावणे (159) यांना पराभवाची धूळ चारली.

हेही वाचा:

Back to top button