नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव येत्या शुक्रवारी (दि.15) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी व भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरात भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांच्यावर मंगळवारी (दि. 12) नगर परिषदेने केलेली कारवाई फार्स ठरली आहे. कारण अधिकारी, कर्मचार्यांची पाठ फिरताच परिस्थिती 'जैसे थे' झाली आहे.
भैरवनाथ मंदिर परिसरातील टपरीधारकांनी तर मुख्याधिकार्यांच्या नोटिशीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून आले. हारवाले टपर्यांच्या पुढे बस्तान मांडून आहेत. यात्रोत्सव एक दिवसावर आला असताना ही स्थिती आहे. गुरुवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे नगर परिषदेला शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे आता या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार, असा प्रश्न यात्रा कमिटी व भैरवनाथ महाराज मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्यांसह भाविकांकडून होत आहे. मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिसांनी मंगळवारी संयुक्त कारवाई केली. नेहरू चौक परिसरातून अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या भागातील हातगाडीवाल्यांना हातगाडे काढून घेण्यास सांगण्यात आले. तथापि, भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर परिषदेने हाती घेतलेली मोहीम फार्स ठरल्याचे दिसत आहे. नाशिक वेस, गंगावेस तसेच भैरवनाथ मंदिर परिसरातही कारवाई करण्यात आली होती. मात्र, परिस्थितीत अद्याप बदल झालेला नाही.
भैरवनाथ मंदिर परिसरात वाहतूक कोंडी कायम
नाशिक वेशीसह भैरवनाथ मंदिर परिसरात होणारी वाहतूक कोंडी कायम आहे. भाजीविक्रेते मागे हटलेले नसल्याने सकाळ-सायंकाळ वाहतुकीचा खोळंबा बघायला मिळत आहे. वस्तुत: नगर परिषद व पोलिसांनी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. मात्र, तसे झालेले दिसत नाही. यामुळे नगर परिषदेने केलेल्या वरवरच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवारी संयुक्त कारवाई केली. नेहरू चौक परिसरातून अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या भागातील हातगाडीवाल्यांना हातगाडे काढून घेण्यास सांगण्यात आले. तथापि, भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर परिषदेने हाती घेतलेली मोहीम फार्स ठरल्याचे दिसत आहे. नाशिक वेस, गंगावेस तसेच भैरवनाथ मंदिर परिसरातही कारवाई करण्यात आली होती. मात्र, परिस्थितीत अद्याप बदल झालेला नाही.