

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; दहशत माजवणार्यांवर अंबड पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली असून, उत्तमनगर भागातील शुभम पार्क येथे गाड्यांच्या काचा फोडणार्या वैभव लोखंडेसह अन्य गुन्ह्यांतील तीन अशा एकूण चार आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी ही माहिती दिली.
9 फेब्रुवारी रोजी वैभव लोखंडे व त्याच्या साथीदारांनी भांडणाची कुरापत काढून चाकू, कोयता अशा हत्यारांनी एका दुकानाची तोडफोड केली होती. दुकान कर्मचारी प्रमोद बोरकर याला मारहाण केली होती. गाड्यांची तोडफोडही केली होती. या गुन्ह्यातील आरोपी वैभव लोखंडे तसेच अन्य गुन्ह्यातील आरोपी आशीर्वाद सीताराम डगळे, गौरव उमेश पाटील व शुभम दादाराव खरात यांना तडीपार करण्यात आले आहे.