Mumbai : मुंबईत कोरोनाचे नवे ५२ रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ३०९ वर | पुढारी

Mumbai : मुंबईत कोरोनाचे नवे ५२ रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ३०९ वर

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबईत पुन्हा कोरोनाची (COVID 19) भिती निर्माण झाली आहे. येथे नवीन ५२ रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) दिली आहे. सोमवारी मुंबईत २६ रुग्ण आढळून आले होते. पण मंगळवारी रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. शहरात ५० हून अधिक नवीन COVID-19 रुग्ण आढळून येण्याची ही महिन्यातील चौथी वेळ आहे.

२४ तासांत ५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील १०लाख ३८ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या येथे ३०९ सक्रिय रुग्ण आहेत. येथील कोरोनामुक्तीदर ९८ टक्के असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे.

गेल्या २४ तासांत शहरात (Mumbai) १०,०७८ कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत झालेल्या कोविड-१९ चाचण्यांची एकूण संख्या १ कोटी ६७ लाख ३५ हजार २०२ झाली आहे. शहरात सीलबंद इमारती आणि कंटेनमेंट झोन कुठेही नाहीत, असेही हेल्थ बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Back to top button