राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा हे म्हणावं का? आव्हाडांचं प्रत्युत्तर | पुढारी

राज ठाकरेंचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा हे म्हणावं का? आव्हाडांचं प्रत्युत्तर

जळगाव पुढारी वृत्तसेवा 

राज ठाकरे यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की, माझं तोंड नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कुणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आदर करतो. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता आहे हे महाराष्ट्र ओळखतो, असं जोरदार प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना दिले.

ना. जिंतेद्र आव्हाड हे जळगाव  जिल्ह्यात एका कार्यक्रमाला आले होते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांचा समाचार घेतला. यावेळी महाराष्ट्रात स्टॅण्ड अप कॉमेडियीनच्या जागा खूप खाली आहेत त्या राज ठाकरे यांनी घ्यावा असा सल्ला आव्हाडांनी दिला.

अशा टीका करणे मिमिक्री आर्टिस्ट चे काम असते. ज्याच्या मध्ये प्रगल्भता आहे तो समोरच्याचा आदर करतो. जी महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती आहे  ज्यांची समाजात प्रतिष्ठा आहे, त्यांना मी अरेतुरे करत नाही. म्हणून मी राज साहेबांना एवढेच सांगतो, माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असे तुम्ही जर म्हणाल तर माझ्यातील मस्तीखोर बाहेर आला तर मी म्हणेल तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे बोलवं का? असा खोचक सवाल त्यांनी केला.

शाहू फुले आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते. यांना कधीच कळले नाही. कारण यांनी बहुजन समाजाचा इतिहास कधी वाचला नाही ते नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत आले आहे. ज्या पुरंदरेने जेम्स लेन ला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली ते यांचे आदर्श आहेत असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button