नाशिक : टोइंग व्हॅन ठेक्यास शहर पोलिसांकडून पुन्हा मुदतवाढ | पुढारी

नाशिक : टोइंग व्हॅन ठेक्यास शहर पोलिसांकडून पुन्हा मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नो पार्किंगमधील चारचाकी व दुचाकी वाहने उचलून नेणार्‍या टोइंग व्हॅन ठेक्यास शहर पोलिसांनी तिसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. या आधी ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीसाठी टोइंग ठेक्यास मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. मार्च महिन्यात ठेकेदाराने मुदतवाढीसाठी अर्ज केल्याने पोलिसांनी टोइंग ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी शहर पोलिसांनी खासगी ठेकेदार नेमून टोइंग व्हॅन सुरू केल्या. त्यानुसार दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. शहरातील मोजक्याच ठिकाणी टोइंग कारवाई होत असून, अनेकदा वाहनचालक व टोइंग कारवाई करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये वाद होत असल्याचे प्रसंग उद्भवतात. दरम्यान, टोइंग ठेक्यास मुदत संपल्यानंतर मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता पुन्हा मुुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिलनंतर नव्याने टोइंग ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टोइंग ठेक्यास मुदतवाढ दिलेली आहे.

हेही वाचा :

Back to top button