‘द काश्मिर फाईल्स’ चा साधु-महंतांसाठी खास शो | पुढारी

'द काश्मिर फाईल्स' चा साधु-महंतांसाठी खास शो

नाशिक पुढारी वृत्तसेवा : द कश्मिर फाइल्स या बहुचर्चित व प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या चित्रपटाचा खास शो शहर व जिल्हयातील साधुमहंतांसाठी आयोजित करण्यात आला होता. या विशेष शोसाठी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील आखाडा परिषदेचे महंतांसह गुरुकूलमधील विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी प्रेक्षकांकडून चित्रपटातील भूमिकेचे समर्थन करण्यात आले.

विवेक अग्निहोत्री यांनी १९९० मध्ये काश्मिर खोऱ्यातील पंडितांवर केलेल्या अमानुष अत्याचारातून त्यांनी पलायन केले. त्यानंतर ते अनेक वर्षांपासून आपल्याच देशात निर्वासितांचे जिणे जगत आहे, या विषयाची मांडणी द कश्मिर फाईल्स या चित्रपटामधून केली आहे. या चित्रपटाचे भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांकडून स्वागत झाले आहे. हा दुर्लक्षित झालेला विषय जगाच्या समोर आणल्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांना अनेक देशांमधील प्रमुख संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हयातील प्रमुख साधु, महंत यांनी हा चित्रपट बघावा म्हणून अनिकेत शास्त्री यांनी सोमवारी (दि.११) विशेष चित्रपट शो आयोजित केला होता. जवळपास २०० जणांनी हा चित्रपट बघितला. यावेळी स्वामी सविदानंद सरस्वती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती, महंत भक्तीचरण दास, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, लक्ष्मण सावजी आदींची प्रमुख उपस्थिती होती. चित्रपटाच्या प्रारंभी सर्व साधु समाजाकडून राम रक्षा, हनुमान चालीसा यांचे पठण करण्यात आले. यावेळी जो हिंदूहित की बात करेगा, वो देश पे राज करेगा, अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है आदी घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा :

Back to top button