नाशिक : गणेशचौकात अतिक्रमण हटविले | पुढारी

नाशिक : गणेशचौकात अतिक्रमण हटविले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
येथील गणेशचौक ते स्टेट बँक चौकाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत शेड उभारल्याने रात्रीच्या वेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सिडकोच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली.

सिडकोतील प्रभाग 24 मध्ये गणेश चौकापासून स्टेट बँक चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावरील भागात लोखंडी, पत्र्याचे अनधिकृत शेड उभारलेले होते. त्यामुळे भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी या नागरिकांना व्यावसायिकांकडे काही खरेदीसाठी जायचे असल्यास भर रस्त्यात वाहनांची पार्किंग केली जाते. यामुळे या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना अनेक दुचाकी वाहनांना अडथळा निर्माण होतो. याबाबत अतिक्रमण विभागाला तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. मनपाच्या अतिक्रमण विभागानेे अनधिकृत शेड जेसीबीच्या सहाय्याने काढले. या कारवाईत तब्बल पंधरा ते वीस लोखंडी पत्र्याचे शेड काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. ही कारवाई सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button