नाशिक-पुणे रेल्वेमार्ग भूसंपादनाला गती; शेतकर्‍यांचे लक्ष बागायती क्षेत्राच्या दरांकडे | पुढारी

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग भूसंपादनाला गती; शेतकर्‍यांचे लक्ष बागायती क्षेत्राच्या दरांकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी सिन्नरच्या चार गावांमध्ये जिरायती क्षेत्राचे दर घोषित झाल्यानंतर बाधित शेतकर्‍यांचे लक्ष आता बागायती क्षेत्राच्या दरांकडे लागले आहे. प्रशासनाकडून येत्या पंधरवड्यात बागायतीचे दर घोषित होण्याची शक्यता आहे.

नाशिक-नगर-पुणे जिल्ह्यांना जोडणार्‍या हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नाशिक व सिन्नर तालुक्यांत 22 गावांमध्ये जमीन संपादित केली जाणार आहे. प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी सिन्नरमधील पाटप्रिंपी, बारागावप्रिंपी, वडझिरे व दातली गावांमधील जिरायतीचे दर घोषित केले. त्यामध्ये बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी 52 ते 68 लाखांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. पण, हे दर घोषित करताना बागायती क्षेत्राबद्दल प्रशासनाने कोणतेच दर जाहीर केले नव्हते.

सिन्नरमधील चारही गावांमधील जिरायतीचे दर घोषित केल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये थेट खरेदीद्वारे शेतकर्‍यांकडून जमीन खरेदीस प्रारंभ होऊ शकतो. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत प्रशासनाकडून बागायती क्षेत्राच्या दराबद्दल तूर्तास कोणतीच घोषणा केलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये संबंधित गावांमध्ये बागायती क्षेत्र निश्चित करून त्यानुसार दर जाहीर करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांच्या नजरा आता बागायती क्षेत्राच्या दरांकडे लागलेल्या आहेत.

HBD Pallavi Joshi : पल्लवीला पहिल्या भेटीत आवडले नव्हते विवेक अग्निहोत्री

मार्गात 24 स्थानके…
नाशिक ते पुणे हा 235 किलोमीटरचा दुहेरी रेल्वेमार्ग आहे. पहिल्या टप्प्यात या रेल्वेमार्गावर 200 किलोमीटर प्रतिवेगाने रेल्वेगाड्या धावणार असून, भविष्यात त्यात 250 किलोमीटरपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन शहरांतील अंतर पावणेदोन तासांत कापणे शक्य होईल. या मार्गावर 24 स्थानके असतील. तसेच मार्गात 18 बोगदे, 41 उड्डाणपूल व 128 भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत.

हेही वाचा :

Back to top button