नाशिक : कुणाच्या दबावामुळे नाही तर वैयक्तिक कारणास्तव बदलीसाठी अर्ज

पोलिस आयुक्त नाशिक
पोलिस आयुक्त नाशिक

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय हे चर्चेत आहे. आज दिवसभर पोलिस आयुक्तांनी बदलीसाठी गृहविभागाकडे अर्ज केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यावर आता पोलिस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पोलिस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे गेल्या आठ ते नऊ दिवसांपूर्वीच मी बदलीसाठी अर्ज केला आहे. यात कुठलेही राजकारण नाही किंवा कुणाच्याही दबावामुळे नाही तर वैयक्तिक कारणास्तव बदलीसाठी अर्ज केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news