‘हबल’ने शोधला सर्वात दूरवरचा तारा | पुढारी

‘हबल’ने शोधला सर्वात दूरवरचा तारा

वॉशिंग्टन ः हबल अंतराळ दुर्बिणीने आतापर्यंत शोधण्यात आलेल्या तार्‍यांपैकी सर्वाधिक अंतरावरील तारा शोधला आहे. हा तारा पृथ्वीपासून 28 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा तारा एकच आहे की दोन तार्‍यांची ही प्रणाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा तारा सूर्यापेक्षा 500 पट अधिक मोठा असू शकतो. तसेच सूर्याच्या तुलनेत त्याचा प्रकाश लाखो पट अधिक असू शकतो. ब—ह्मांडाच्या बाल्यावस्थेवेळीच या तार्‍याची निर्मिती झालेली आहे.

नऊ तासांच्या कालावधीत हा तारा दूरवरूनही दिसत होता व त्याचवेळी ‘हबल’ने त्याला आपल्या कॅमेर्‍यात कैद केले. त्याच्याजवळील आकाशगंगांनी ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ नावाचा प्रभाव टाकल्यामुळे या तार्‍याचा प्रकाश हजारो पटीने अधिक वाढला व तो ‘हबल’पर्यंत पोहोचू शकला.

याबाबतची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. या तार्‍याला ‘डब्ल्यूएचएल 0137-एलएस’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, संशोधकांनी त्याला जुन्या इंग्रजी भाषेतील ‘वाढणारा प्रकाश’ किंवा ‘उगवतीचा तारा’ अशा अर्थाचे ‘इरेंडेल’ असे नाव दिले आहे. ज्या महास्फोटानंतर ब—ह्मांडाची निर्मिती झाली त्या ‘बिग बँग’नंतर सुमारे 900 दशलक्ष वर्षांनी या तार्‍याची निर्मिती झाली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button