धुळ्याचा हरपाल ठरला ‘दिंडोरी श्री’ | पुढारी

धुळ्याचा हरपाल ठरला ‘दिंडोरी श्री’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बॉडीबिल्डिंग और फिटनेस असोसिएशन उत्तर महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन नाशिक आयोजित ‘दिंडोरी श्री 2022’चा किताब धुळ्याच्या हरपाल राजपूत याने, तर मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डरचा मान नाशिकच्या दीपक डंबाळे याने पटकविला. तसेच बेस्ट पोझरचा मान नाशिकच्या सोनू पवार याला, तर ‘फिजिकली चॅलेंज (दिव्यांग)’चा किताब नाशिकच्या मर देवर याला मिळला. ‘वूमन फिटनेस’च्या मानकरी सिमरन रहाणे ठरल्या. ‘मेन्स फिजिक’चा किताबसुद्धा नाशिकच्या गौरव ठाकरे याने मिळवला..

या स्पर्धेत नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार व जळगावच्या तब्बल 165 स्पर्धकांनी बॉडीबिल्डिंग, मेन्स फिजिक, वूमन फिटनेस आणि फिजिकली चॅलेंज (दिव्यांग) या चार प्रकारांत सहभाग नोंदविला.

दिंडोरीच्या आदिवासी भवनात झालेल्या या स्पर्धेत खरी रंगत ‘दिंडोरी श्री’ या प्रकारात बघायला मिळाली. अंतिम फेरीत 7 ही गटांचे विजेते किताबासाठी एकमेकांसमोर ठाकले. पण खरी लढत दीपक डंबाळे, हरपाल राजपूत व साकीब शेख यांच्यात रंगली. राजपूतने आपल्या प्रमोशन, मस्क्युलनॅलिटीच्या बळावर विजय मिळवला.

विजेत्या खेळाडूंना महेश पगारे, राजेंद्र सातपूरकर, के. के. वाघ शैक्षणिक संस्थेचे अजिंक्य वाघ, आयोजक साजन पगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी धनंजय काळे, ओझरचे उपसरपंच हेमंत जाधव, नगरसेवक प्रदीप घोरपडे, गणेश बोरस्ते, अनिल देशमुख, सागर पगारे, नितीन देशमुख, परिक्षित देशमुख, सुनील गांगुर्डे आदी उपस्थित होते. पंच म्हणून किशोर सरोदे, प्रकाश दाभाडे, संजय जाधव, सोहेल शेख, हेमंत साळवे, अ‍ॅड. नीलेश संधान, युसुफ शेख, विशाल बेद, सत्यजित बच्छाव आदींनी काम पाहिले.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

 

Back to top button