नाशिक ते अजमेर ट्रेन सुरु करा : आम आदमी पार्टीची मागणी, खासदारांना निवेदन | पुढारी

नाशिक ते अजमेर ट्रेन सुरु करा : आम आदमी पार्टीची मागणी, खासदारांना निवेदन

नाशिक पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पार्टी नाशिकच्या पदाधिका-यांतर्फे नाशिकचे खासदार व लोकप्रतिनिधी हेमंत गोडसे यांना नाशिक ते अजमेर शरीफ ट्रेन सुरु करण्याबाबत निवेदन देण्यात आले. नाशिक ते अजमेर (राजस्थान) अशी एक रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून नाशिक, मनमाड मालेगाव, धुळे जळगाव आणि इतर शहरातील लोकांना अजमेर या धार्मिक स्थळी कुठल्याही अडचणी शिवाय जाता येईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

नाशिक शहर व संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास सुमारे दहा लाख भाविक दरवर्षी अजमेरला दर्शनासाठी जात असतात, त्यांना अजमेरला जाण्यासाठी नाशिकवरून आधी मुंबईला जावे लागते, मग तेथून प्रवास सुरु होतो. यामध्ये भाविकांचे अर्थिक नुकसान तर होतेच आहे, परंतु मानसिक व शारीरिक कसरत सुद्धा होते, जर सदर मार्गाप्रमाणे रेल्वेगाडी सुरु झाली तर मुस्लीम समाजाबरोबरच सर्व धर्मीय भविकांचा त्रास कमी होऊन सामान्य लोकांना सुविधा मिळेल.

नाशिक, मनमाड, मालेगांव, धुळे, जळगाव, भुसावळ व मार्गातील जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त हिंदु-मुस्लीम बांधवांना याचा फायदा होऊ शकतो असे निवेदनात म्हटले आहे.  यावेळी पदाधिकारी स्वप्निल घिया, चंदन पवार, माजिद पठान, सुनील सोनवणे, सादिक अत्तार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button