नाशिक महापालिकेत सत्ता परिवर्तन अटळ : सुनील बागूल | पुढारी

नाशिक महापालिकेत सत्ता परिवर्तन अटळ : सुनील बागूल

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा ; शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत जनताभिमुख कामे केली आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेत सत्ता परिवर्तन अटळ असून, पंचवटी विभागातील शिवसैनिक तसेच महिला आघाडीने संघटना वाढीसाठी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन शिवसेना उपनेते सुनील बागूल यांनी केले.

शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र. १ ते ८ मधील शिवसेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आयोजित बैठकीत बागूल बोलत होते. व्यासपीठावर पश्चिम नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख आबासाहेब पतंगे, विधानसभाप्रमुख नितीन चिडे, शिवसेना माजी महानगरप्रमुख महेश बडवे, महिला आघाडी पदाधिकारी मंगला भास्कर, शोभा मगर, शोभा गटकळ, लक्ष्मी ताठे, ज्योती देवरे, स्वाती पाटील, किरण गायकवाड, शोभा दिवे, कल्पना पिंगळे, मनीषा हेकरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचवटीतील १ ते ८ या प्रभागांतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीला शिवसेना विधानसभा संघटक विशाल कदम, उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी, वैभव खैरे, अमोल सूर्यवंशी, महेंद्र बडवे, संजय थोरवे, रुपेश पालकर, नंदू वराडे, अंकुश काकड, सविता म्हस्के, शोभा वार्डे, रंजना थोरवे, भारती बोढाई, शोभा रौंदळ, हिराबाई भाबड, अनिता वाघ, शुभम घुले, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्य जनता, शेतकरी हिताचे निर्णय घेतले. शिवसेनेचे विचार, महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय घरोघरी पोहोचविण्याचे काम करून शिवसेनेचे जनतेशी असलेले नाते अधिक घट्ट करा. – भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख

हेही वाचा :

Back to top button