Viral Video : शाळकरी चिमुकलीचा डान्स पाहून नेटकरी झाले 'सैराट' ! | पुढारी

Viral Video : शाळकरी चिमुकलीचा डान्स पाहून नेटकरी झाले 'सैराट' !

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनेटच्या जगात कधी काय होईल यांचा अंदाज लावता येत नाही. सध्या एका शाळकरी मुलांचा धमाकेदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video ) होत आहे. यातील एका चिमुरडीच्या अप्रतिम डान्स स्टेप्सवर चाहते फिदा झाले आहेत.

रॅपर बादशाह याच्या ‘जुगनू’ गाण्यावर नुकताच एका छोट्या शाळकरी मुलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल ( Viral Video) होत आहे. या व्हिडिओत एका चिमुरडीसोबत शाळेतील अनेक मुलं आणि मुले देखील या गाण्यावर डान्स ठूमके लावताना दिसत आहेत. परंतु, या चिमुरडीने केलेल्या अप्रतिम आणि सुंदर डान्स स्टेपने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या हात- पायाच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले.

यावेळी लाल रंगाच्या शर्ट आणि निळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये मुले खूपच क्यूट दिसत आहेत. यासोबत मुलांच्या बाजूला डिजे लावला असून त्याच्या चेहऱ्यावर मास्क देखील दिसत आहे. यामुळे हा व्हिडिओ शाळेतील एका कार्यक्रमा दरम्यानच्या असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. डीजे मॉन्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुलांमध्ये असे कलागुण असतात हे नकळत समोर येत असतात. काही वेळा याकडे दुर्लक्ष देखील होत असते. चिमुरडीची हा व्हिडिओ थक्क करणारा होता.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला एक लाख ७६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने तिच्या अप्रतिम डान्सचे कौतुक करत ‘ती एक स्टार आहे आणि स्वत:चा खूप आनंद घेत आहे.’ असे म्हटले आहे तर दुसऱ्या एका युजर्सने ‘भाऊ, जर तुम्हाला डान्स शिकायचा असेल तर या चिमुरडीकडून शिका, ती तुम्हाला चांगले शिकवेल.’ असा सल्ला देखील दिला आहे. याशिवाय आणखी काही चाहते तिच्या एक्सप्रेशन्स आणि क्युटनेसमुळे अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे यांची अध्याप माहिती मिळालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monty (@dj._monty_official_)

Back to top button