केंद्रीय आरोग्य विभागाच्या सर्वरोगनिदान शिबिरास प्रारंभ | पुढारी

केंद्रीय आरोग्य विभागाच्या सर्वरोगनिदान शिबिरास प्रारंभ

नाशिक : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आरोग्य सेवा अंतर्गत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे जिल्ह्यात सर्वरोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातर्फे मनमाड, पेठ कळवण या तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयांत 28 ते 30 मार्च रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचपर्यंत सर्वरोगनिदान व उपचार शिबिर सुरू आहे. शिबिरात जिल्हा रुग्णालय नाशिक तसेच नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि येथील स्त्रीरोगतज्ज्ञ भीषक, अस्थिरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक नेत्रशल्यचिकित्सक सोनोग्राफी तज्ज्ञ यांच्यामार्फत रुग्णांची तपासणी, रोगनिदान व उपचार करीत आहेत.

स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग निदान व मोफत तपासणी करण्यात येत आहे. शिबिराचा कळवण, मनमाड आणि पेठ पंचक्रोशीतील आणि लगतच्या तालुक्यातील परिसरातील कन्या, माता व भगिनींनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचारी यांचेकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button