शेतात सापडलेल्या दगडाने बनवले कोट्यधीश | पुढारी

शेतात सापडलेल्या दगडाने बनवले कोट्यधीश

लंडन ः जगभरात अनेकांना अंतराळातून आलेल्या दगडांनी म्हणजेच उल्कांनी कोट्यधीश बनवलेले आहे. आता बि—टनच्या नॉर्थ वेल्समधील एका शेतकर्‍याबाबतही असेच घडले आहे. त्याच्या शेतात सापडलेल्या या अनोख्या दगडाने त्याला रातोरात करोडपती बनवले!

38 वर्षांचा टोनी व्हिल्डिंग रेक्सहॅममध्ये राहतो. एकदा त्यांना आकाशातून एक जळती वस्तू खाली कोसळत असताना दिसली. त्याने सांगितले, मी रात्री घरामागील बागेत बसलो असता चेंडूसारखी एक पेटती वस्तू खाली येत असताना पाहिली. अतिशय वेगाने ही वस्तू खाली आली आणि आमच्या शेतात कोसळली.

काही सेकंदातच त्या गोळ्याची आग आटोक्यात आल्याचे दिसून आले. तेथून केवळ धूरच येत होता. त्यानंतर मी ही वस्तू शोधण्याचा बराच प्रयत्न केला. अखेर अठरा महिन्यांनी ही उल्का सापडली. या उल्केची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समजले!

हेही वाचलंत का? 

Back to top button