भंडारा : नोकरी मिळत नसल्‍याने वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरूणाची आत्‍महत्‍या | पुढारी

भंडारा : नोकरी मिळत नसल्‍याने वडिलांना व्हिडिओ कॉल करून तरूणाची आत्‍महत्‍या

भंडारा; पुढारी वृत्‍तसेवा : अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणाने कवलेवडा धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. कृषिलेष राजू कनोजे (वय 29, रा. गोंदिया) हा बीकॉम पास असुन स्पर्धा परीक्षा देत होता. कृशीलेष हा सन 2013 पासून स्पर्धा परीक्षा देत होता. मात्र नोकरी लागत नसल्याने तो नेहमी नोकरीच्या चिंतेत राहत होता.

रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी असताना कृषिलेष हा घरी कोणाला काही न सांगता घरची मोटरसायकल क्रमांक क्र एम एच 29 एए 8382 ही घेऊन गेला होता. सायंकाळी 6:30 वाजता कृषिलेष याने त्‍याच्या वडिलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून सांगितले की, तो कवलेवाडा डॅम येथे आत्महत्या करीत आहे. असे सागुन मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल रेकाँर्डिग करून आत्महत्या केली.
मृत कृषिलेष हा सध्या कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा कामधंदा नसल्याने तणावात होता. यातूनच त्‍याने आत्महत्या केली. या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास ठाणेदार नारायण तुरकुंडे करीत आहेत.

Back to top button