नांदेड : पुसद – उमरखेड मार्गावर बर्निंग बसचा थरार | पुढारी

नांदेड : पुसद - उमरखेड मार्गावर बर्निंग बसचा थरार

मुळावा (उमरखेड), पुढारी वृत्तसेवा : पुसद – उमरखेड मार्गावरील शिळोणा घाटात एसटी बसला आग  (burning bus) लागल्याची घटना आज (दि २७) दुपारी घडली. बस चालकाच्या प्रसंगावधानाने २१ प्रवाशांना तत्काळ बस खाली उतरवल्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सध्या काही बसस्थानकातून मोजक्याच बसेस सुरु आहेत,  पुसद डेपोची विनावाहक बस ( एम. एच ४० -ऐ.क्यु. ६१७०) नांदेडकडे निघाली होती.  शिळोणा घाट पार करत असताना अचानक बसच्या इंजिनजवळ आग (burning bus) लागल्‍याचे कंत्राटी बसचालक अरुण फुके यांच्‍या निदर्शनास आले. त्‍यांनी बस तत्काळ थांबवली. बसमधील २१ प्रवाशांना खाली उतरवले. ही माहिती मिळताच पोफाळी पोलीस आणि उमरखेड अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.दरम्यान, एक तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

या आगीत बसच्या समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. दुपारच्या सुमारास बसमधील प्रवासी भर उन्हात पाण्याविना ताटकळत उभे होते. या घटनेत दोन प्रवाशांचे सामान जळाले असून काही राेकडसुद्‍धा जळाली आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button