एकनाथ शिंदे : समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्पा लवकरच खुला होणार | पुढारी

एकनाथ शिंदे : समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्पा लवकरच खुला होणार

नागपुर ; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात दिली. आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाच्या याच पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.

समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे.

समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्यांचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला, याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल असे एकनाथ शिंदे म्हणाले .

या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर ८ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत.

आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये-जा सुरू केली असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्यांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत.

Koo App

’मन की बात’ के आज के 87वें संस्करण में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभिन्न विषयों पर बात की और कई प्रेरक विचार साझा किए। काशी निवासी पद्मश्री बाबा शिवानंद जी का उल्लेख उन्होंने किया। 126 वर्ष की आयु में बाबा शिवानंद जी की स्फूर्ति एवं स्वास्थ्य जीवन में योग के महत्व को दर्शाते हैं। #MannKiBaat

Nitin Gadkari (@nitin.gadkari) 27 Mar 2022

Koo App

अमरावती जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीची मुहूर्तमेढ रोवली जाणार. नांदगाव पेठ येथील साडे अठरा हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात याबाबत समिती पाहणी करण्यासाठी अमरावतीत दाखल होणार आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/site-survey-for-gmch-in-amravati-next-week/articleshow/90466182.cms

Yashomati Thakur (@advyashomatiinc) 27 Mar 2022

Koo App

जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या दर्जेदार कलाकृतीतून मराठी रंगभूमीची पताका जगभर फडकवणाऱ्या व रंगभूमीची निष्ठेने सेवा करणाऱ्या रंगमंचावरील आणि पडद्यामागील सर्व कलाकारांना, नाट्यप्रेमी प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #WorldTheatreDay2022 #WorldTheatreDay #अंतरराष्ट्रीय_रंगमंच_दिवस #जागतिक_रंगभूमी_दिन

Yashomati Thakur (@advyashomatiinc) 27 Mar 2022

Back to top button