नाशिक : ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल मधून उलगडणार द्राक्ष उत्पादन ते वाइन निर्मितीचा प्रवास | पुढारी

नाशिक : ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल मधून उलगडणार द्राक्ष उत्पादन ते वाइन निर्मितीचा प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

द्राक्षपंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे. द्राक्ष उत्पादन ते वाइन निर्मितीचा प्रवास पर्यटकांसह सर्वसामान्य नाशिककरांसमोर उलगडून दाखविण्यासाठी येत्या 26 आणि 27 मार्चला पर्यटन महामंडळाच्या गंगापूर धरणाजवळील ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे दोन दिवसीय ‘ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल’ होणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला आणखी चालना देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी सांगितले.

‘ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल’ची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. 21) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या महोत्सवात विविध प्रकारच्या द्राक्ष प्रजातींचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. याशिवाय द्राक्ष पाककला स्पर्धा, वारली चित्रकला कार्यशाळा, द ग्रेट ग्रेप एस्केप, वाइन प्रदर्शन व विक्री, कला दालन व शॉपिंग बाजार, कॅलिग्राफी कार्यशाळा, विनेयार्ड आणि वायनरी टूर, फॅशन शो आदींची मेजवानी पर्यटकांना मिळणार असल्याचे उपसंचालक सरदेसाई-राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांसाठी द्राक्ष प्रदर्शन भरविण्यात येणार असून, त्यासाठी 50 स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यापैकी 30 स्टॉलचे बुकिंग झाले आहे, तर महोत्सवात नाशिकची वैशिष्ट्ये सांगणारे आणि नाशिकच्या संस्कृतीची ओळख करून देणारे 10 स्टॉल्स असणार असल्याचे उपसंचालक सरदेसाई-राठोड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button