नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा : सातपूर अंबड लिंक रोड परिसरात मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा करणारी वॉल तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. वॉल तुटल्याने पन्नास फुटी फवारा तयार झाला होता.
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संजीव नगर परिसरातील अंबड एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या वॉल ला ट्रकने धडक दिल्याने वॉल तुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे मोठा कारंजा तयार झाला होता. तर अनेकांनी या कारंजाच्या पाण्यात आपली वाहने धुण्याचा प्रकार देखील दिसून आला. तसेच रंगपंचमी चे औचित्य साधत काही युवकांनी या कारंजाच्या पाण्यातच अंघोळी केल्या. त्यामुळे काही काळ या रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळीं परिसरातील नागरिकांनी कारंजा बघण्यासाठी गर्दी केली होती. एमआयडीसीच्या आपत्कालीन विभागाचे घटना कळताच त्यांनी तातडीने पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
हेही वाचा :