नाशिक : ‘त्या’ झापावर पुन्हा बिबट्याचे दर्शन, परिसरात घबराट | पुढारी

नाशिक : 'त्या' झापावर पुन्हा बिबट्याचे दर्शन, परिसरात घबराट

नाशिक (इगतपुरी) : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे भागातील गावठा परिसरात शेतातील झापावर झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर मागील आठवड्यात बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे बसविले होते. गुरुवारी हा बिबट्या पुन्हा त्या झापावर भक्ष्याच्या शोधात आला असता, तो कॅमेर्‍यात कैद झाला.

हा जंगल परिसर असल्याने बिबट्याचा वावर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. स्थानिकांची बिबट्यासंदर्भात काय दक्षता घ्यावी, याची माहिती देत वनविभाग जनजागृती करीत आहे. बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्याच्या वावर असल्याने लहान मुलांना घराबाहेरही सोडता येत नसल्याचे पालकांनी सांगितले. बिबट्या कधी पकडला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button