जळगाव : मद्यपान केल्‍याने पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून | पुढारी

जळगाव : मद्यपान केल्‍याने पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

जळगाव पुढारी वृत्तसेवा : पत्नीने मद्यपान केल्यामुळे  पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून तिची हत्या केल्याची थरारक घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, मध्यप्रदेश) हा पत्नीसह सालदारीवर काम करण्यासाठी मेहूणबारे शिवारातील शेतात आला हाेता. त्याचठिकाणी एका शेडमध्ये ताे वास्तव्यास हाेता. शुक्रवार[ ( दि. १८ )  कुवरसिंग याने पत्नी निनुबाई हिला ‘तू मद्यपान का केलेस ‘, अशी विचारणा करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड त्‍याने निनुबाईच्‍या डोक्यात घातली. तिचा जागीच मृत्‍यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मेहूणबारेचे सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण, धर्मराज पाटील, सुभाष पाटील, मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके आदींनी घटनास्थळी पंचनामा केला.  डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा खून केल्याची कबुली कुवरसिंग याने दिली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आहे.

हेही वाचा

Back to top button