नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कॉलेज रोड परिसरात एकाने तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १२) रात्री घडला. या प्रकरणी पीडितेने संशयित अभिमन्यू पी. सूर्यवंशी (रा. पंचवटी) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवणास गेली हाेती. तेथून बाहेर पडल्यानंतर संशयित अभिमन्यूने तिचा विनयभंग करून मारहाण करीत पळ काढला. या प्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.