The Kashmir Files : दिग्दर्शक ‘विवेक अग्निहोत्री’ विरूद्ध काढला होता फतवा | पुढारी

The Kashmir Files : दिग्दर्शक 'विवेक अग्निहोत्री' विरूद्ध काढला होता फतवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या शुटिंगच्या शेवटच्या दिवशी दिग्दर्शक अभिनेता विवेक अग्निहोत्री याच्या विरोधात जम्मू काश्मीर सरकारने फतवा काढत, चित्रपटाच्या शुटिंगसाठी विरोध केला होता. यादरम्यान विवेक यांना अनेक धमक्याही आल्या. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण या चित्रपटाचे यश पाहून, आम्ही आणि आमची टीम समाधानी असल्याचे, दिग्दर्शकाची पत्नी निर्मात्या अभिनेत्री पल्लवी जोशी सांगते. एका मुलाखतीदरम्यान तिने ही माहिती दिली.

अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणते की, ‘द काश्मीर फाईल्स’सारखा गंभीर चित्रपट बनवणे सोपे काम नव्हते. यादरम्यान विवेकला इतक्या धमक्या आल्या की, त्यांने त्याचे ट्विटर अकाउंटही डिअॅक्टिव्हेट केले. सततच्या धमक्यांमुळे तो नेहमीच मानसिक ताणतणावात होता. शुटिंगच्या शेवटच्या दिवशीच फतवा काढल्यामुळे काय करावे, हा आमच्यासमोर प्रश्न होता, पण ही गोष्ट आम्ही टिमपासून गुपित ठेवली आणि कामावर लक्ष दिले. टीमला कोणतीही गोष्ट जाणवून नाही दिली. म्हणूनच सगळे बिंदास्थ काम करू शकले आणि हा चित्रपट सत्यात उतरला.

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट नुकताच 11 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या काही दिवसातच दणक्यात कमाई करत, साऊथ स्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटालाही टक्कर दिली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये एकही मेनस्ट्रीम बॉलीवूड स्टार नाही आणि याचे फार मोठे बजेटही नाही.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात 1990 साली नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्येही अव्वल ठरला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू होती. हा चित्रपट लोकांना इतका भावतो की, चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही अनेकांना आपले अश्रू आवरता येत नाहीत.

The Kashmir Files | Official Trailer I Anupam I Mithun I Darshan I Pallavi I Vivek I 11 March 2022

हेही वाचलत का ?

 

Back to top button