नाशिक : सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासर्‍यास तीन वर्षे सश्रम कारावास

नाशिक : सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासर्‍यास तीन वर्षे सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुनेचा छळ केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सासर्‍यास तीन वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. दिगंबर कोंडाजी सोनवणे (56, रा. कौशल्यानगर, रामवाडी) असे या आरोपीचे नाव आहे.

अनिता भूषण सोनवणे (22, रा. कौशल्यानगर) या विवाहितेने ऑगस्ट 2014 मध्ये राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी अनिताचे वडील प्रकाश शिवाजी शेळके (44, रा. नाशिकरोड) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात अनिताचा पती भूषण दिगंबर सोनवणे (31), सासरा दिगंबर सोनवणे, दीर वैभव सोनवणे, अमित सोनवणे यांच्याविरोधात अनिताचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक वाय. ए. देवरे यांनी या तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. आर. एम. कोतवाल यांनी युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी सोनवणे यास 3 वर्षे कारावास व दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून एम. एम. पिंगळे, एस. एल. जगताप, डी. डी. कडवे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news