नाशिक : ‘आप’ कार्यकर्ते गुरुद्वारात नतमस्तक ; नागरिकांना भरवले पेढे

नाशिक : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करताना ‘आप’चे कार्यकर्ते.
नाशिक : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करताना ‘आप’चे कार्यकर्ते.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंजाबमध्ये काँग्रेससह अकाली दल व इतर पक्षांना पराभवाची धूळ चारत बहुमत मिळवणार्‍या आम आदमी पक्षाच्या विजयाचा नाशिकमधील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बाइक रॅली काढण्याबरोबरच गुरुद्वारामध्येही कार्यकर्ते नतमस्तक झाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत मिठाई वाटप करण्यात आले.

एकाही प्रादेशिक पक्षाला जे जमले नाही ते आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये करून दाखवले. काँग्रेसचे पानिपत करीत आपने पंजाबमध्ये एक हाती सत्ता मिळवली. दिल्लीनंतर पंजाब काबीज करणार्‍या आपच्या विजयामुळे मात्र नाशिकमधील कार्यकर्त्यांमध्ये एकच हुरूप संचारला. कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आपचा विजय साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातील बहुतांश भागात बाइक रॅली काढत घोषणाबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच गुरुद्वारातही कार्यकर्ते नतमस्तक झाले. यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी पगडी परिधान करीत विजय साजरा केला.

नांदगावी 'आप' कार्यकर्त्यांनी भरवले पेढे
'आप'ने पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागांवर विजय मिळविल्याचा आनंद येथील 'आप'च्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे भरवून साजरा केला. नांदगाव जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले, लक्की कदम, प्रमोद पगार, नीलेश मंडलिक, सुनील सोमासे, सचिन पांडे, आशिष साळुंके, रवींद्र शिंदे, सतीश सोनवणे, बाळासाहेब बोरसे, अंबादास मोरे, विकास गवळी, जितू गंगेळे, भागिनाथ लोकनर, निवृत्ती शिंदे, प्रकाश शेवाळे, शिवा जाधव आदींनी मिठाई वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

कार्यकर्त्यांच्या डोक्यावर पगडी
पंजाबमध्ये विजय मिळताच स्थानिक कार्यकर्त्यांनी पगडी परिधान करून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी बाइक रॅली काढली. यावेळी प्रत्येकाच्या डोक्यावर पगडी दिसून आली. तसेच गुरुद्वारामध्ये पदाधिकारी नतमस्तक झाले.

पंजाब ही क्रांतिवीरांची भूमी आहे. त्यामुळे पंजाबमधील आपचा विजय हा जनतेचा विजय आहे. या विजयाचा जल्लोष राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 50 पेक्षा अधिक शहरांमध्ये स्क्रीन लावून साजरा करण्यात आला. आम आदमी पक्ष हाच आता पर्याय असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
– धनंजय शिंदे, राज्य सचिव,

हा सामान्य भारतीय माणसाचा विजय आहे. देशात आता खर्‍या अर्थाने लोकशाही रुजणे सुरू झाले आहे. प्रथमच जात, धर्म, पंथ याला फाटा देत सामान्य जनतेने विकासाला मतदान केले आहे. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीतदेखील आप हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल यांचा विश्वास आहे.
– जितेंद्र भावे, प्रवक्ता, आप

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news