नाशिकला दत्तक घेण्याची भाषा करणार्‍यांनी कुठलीही विकासकामे केली नाही : समीर भुजबळ

नाशिकला दत्तक घेण्याची भाषा करणार्‍यांनी कुठलीही विकासकामे केली नाही : समीर भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. कारण नाशिकला दत्तक घेण्याची भाषा करणार्‍यांनी नाशिकसाठी कुठलीही विकासाची कामे केली नाही. नाशिककरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून केला जात असल्याने त्याबाबत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून 'एक तास राष्ट्रवादी'साठी हा उपक्रम नाशिक शहरातील 44 प्रभागांत सुरू करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये गावनिहाय तसेच प्रभागनिहाय सेवा दलप्रमुख निवडण्यात येऊन त्यांच्या समन्वयाखाली बैठकीचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.5) नाशिक शहरातील गोविंदनगर येथे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नाना महाले, बाळासाहेब कर्डक, संजय वझरे, अमर वझरे, सागर मोटकरी, सुनील आहिरे, शेखर देशमुख, अमित वझरे, हर्षल खैरनार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news