नाशिक : संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत उपोषणात सहभागी होणार, सकल मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा | पुढारी

नाशिक : संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत उपोषणात सहभागी होणार, सकल मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा 

आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या सोबत नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंबीय उपोषणाला बसणार असल्याची घोषणा सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये केली. शनिवारी (दि.२६) होणाऱ्या संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाला सक्रिय पाठिंबा देऊन त्याचे नियोजन करण्यासाठी वरदलक्ष्मी लॉन्सवर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो प्रमुख समन्वयक उपस्थित होते.

कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर! पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यावर

मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाचे उभय सरकारांच्या हातात असलेले मुद्दे सोडवून दिलासा देण्याचा प्रस्ताव दिला होता. केवळ प्रस्ताव देऊन संभाजीराजे शांत बसले नाहीत, तर निवडक पाच-सहा मुद्दे काढून त्याची अंमलबजावणी सरकारने केली तरी मराठा समाजाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात. अशी यामागची राजेंची प्रामाणिक भूमिका होती.

मुंबई : नवाब मलिक यांच्याविरोधात प्राथमिकद‍ृष्ट्या पुरावे उपलब्ध

राज्य शासनाने संभाजीराजेंनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला. संभाजीराजेंसह क्रांती मोर्चा सोबत बैठकी झाल्या. आश्वासने दिली गेली. घोषणाही झाल्या. संभाजीराजेंनी दिलेला प्रस्ताव किती व्यावहारिक आहे याचा अभ्यास करण्यासाठी भोसले समितीही स्थापन झाली. भोसले समितीनेही अभ्यास करून राजेंच्या प्रस्तावाला व्यावहारिक म्हणून स्वीकारण्याची शिफारस राज्य सरकारला केली. तथापी राज्य सरकारकडून केवळ शाब्दिक आश्वासनापलीकडे कुठलीही ठोस अंमलबजावणी झाली नाही.

रशियन फौजांची मुसंडी, युक्रेन शरणागती पत्करण्याची शक्यता

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पत वाढवून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे, सारथीसारखी संस्था सक्षम करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी मराठा तरुण पात्र बनविणे, तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि न्यायालयाने निर्देशीत केलेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ पूर्वलक्षी नियुक्त्या देणे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय देण्यासाठी पूर्व निकालाला दिले गेलेले आव्हान खोडून काढण्यासाठी न्यायिक प्रक्रियेला वेग देणे अशा निवडक मुद्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा एव्हढीच खा. संभाजीराजें आणि सकल मराठा समाजाची मागणी आहे.

या साध्या मागण्याही राज्य सरकार केराच्या टोपलीत टाकीत असल्याने राजेंनी टोकाची भूमिका घेत येत्या 26 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करताना अनेक आंदोलनात भाजलेल्या मराठा समाजाला आणखी वेठीस धरायचे नाही, या प्रामाणिक भूमिकेतून ते एकटेच आमरण उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. असे असली तरी सकल मराठा समाज या आंदोलनात सहकुटुंब सहभागी होऊन राज्य सरकारला धडा शिकविणार असल्याचा निर्धार सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने बैठकीत केला आहे.

महायुद्धाचे ढग

नाशिक जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव कुटुंब कबील्यांसह आझाद मैदानावर उपस्थित राहून राजेंसोबत आंदोलनात सहभागी होणार आहेत. आझाद मैदानावर जाण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यासाठी तीन समाजबांधवांची कमिटी स्थापन केली आहे. त्यामध्ये अमित नडगे 8888810798, सागर पवार 899981579, अमोल जगळे 7350006844 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

युक्रेनच्या खासदाराने भारताकडे मागितली मदत

या बैठकीला करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, मनिषा पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, विजय खर्जुल, अशिष हिरे, विलास जाधव, सचिन पवार, संदीप लभडे, बंटी भागवत, संजय सोमासे, विशाल कदम, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, खंडू आहेर, वंदना कोल्हे, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, पूजा तेलंग, पुनम पवार, सुनील भोर, शरद शिंदे, नारायण जाधव, गणपत जाधव, प्रताप जाधव, भूषण तनपुरे, योगेश गांगुर्डे, गिरीश आहेर, कुंदन हिरे, सचिन शिंदे, गौरव पवार, कल्पेश पाटील, मयूर शिंदे, आकाश हिरे, रोहित श्रीवास्तव, निलेश शेजुळ, सुभाष शेजवळ, दिनेश चव्हाण, दिनेश नरवडे, विश्वास तांबे, उत्तम कापसे, समाधान हिरे, संजय निकम, निलेश कचवे, दादा जाधव, उषा पाटील, भारती जाधव यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो समन्वयक उपस्थित होते.

भीतीने जागून काढली रात्र!

Back to top button