युक्रेनच्या खासदाराने भारताकडे मागितली मदत | पुढारी

युक्रेनच्या खासदाराने भारताकडे मागितली मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या दुसर्‍या दिवशी युक्रेनमधील खासदार सोफिया फेडिना यांनी भारताकडून वैद्यकीय आणि राजनैतिक मदतीची मागणी केली.

त्या म्हणाल्या, युक्रेनला केवळ शस्त्रास्त्रे नकोत, तर मानसिक पाठिंब्याचीही गरज आहे. आक्रमकांना धडा शिकविण्याची गरज आहे. मॉस्को शांततावादी युक्रेनियन्सना ठार मारत सुटले आहे. माझी सर्व भारतीय राजनेत्यांना विनंती आहे की, त्यांनी मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आणि सार्वभौम देशाचे संरक्षण करावे.

खासदार फेडिना यांनीही बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घेतला आहे. युक्रेनच्या फौजा रशियाचा प्रतिकार करत आहेत. दक्षिण युक्रेनमधील ओडेस्सा या बंदरावरही रशियाने ताबा मिळवल्याची माहिती खोटी आहे. रशियन माध्यमांचा हा प्रपोगंडा आहे. ओडेस्सा अजूनही किव्हच्या ताब्यात आहे.

Back to top button