बोदवड नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील | पुढारी

बोदवड नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.  बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी झाले असून आज झालेल्या निवडीच्या विशेष सभेत नगराध्यक्षपदाची माळ शिवसेनेचे आनंद पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. आज झालेल्या नगराध्यक्ष निवडीच्या विशेष सभेत शिवसेनेचे आनंद पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने उपस्थित होते.

या निवडणुकीत शिवसेनेचे 9, राष्ट्रवादीचे 7 भाजपाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. आज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची निवड झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून आनंदा पाटील तर राष्ट्रवादीकडून जाफर सेट व योगिता खेवळकर या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी जाफर शेख यांनी अर्ज मागे घेतला.  विरोध म्हणून योगिता खेवलकर यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल करण्यात आला होता. मात्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी गटनेते आनंदा पाटील यांची वर्णी लागली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी तर सहाय्यक नगरपंचायत मुख्य अधिकारी आकाश डोईफोडे यांनी काम पाहिले. नगराध्‍यक्ष पदाच्‍या निवडणुकीत आनंदा पाटील यांना १७ पैकी शिवसेनेचे ९ व भाजपचे १ अशी १० मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या योगिता खेवलकर यांना राष्ट्रवादीचे केवळ ७ मते मिळल्‍याने त्‍यांचा पराभव झाला. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या रेखा गायकवाड यांना देखील १० मते मिळाल्याने त्या विजय झाल्या तर राष्ट्रवादीचे मुज्जमिल शहा यांना ७ मतांवर समाधान मानत पराभव स्वीकारावा लागला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button